न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ डिसेंबर २०२०) :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संस्थेच्या प्राथमिक विद्यालयाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री निंबारकर व प्राथमिक विद्यालयातील शिक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री निंबारकर मॅडम यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोस पुष्पहार घालून प्रतिमा पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात प्राथमिक विद्यालयातील उपशिक्षक हनुमंत जगदाळे व गजानन शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रमुख पाहुण्या मुख्याध्यापिका जयश्री निंबारकर यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांनी सतत उपक्रमशील, नवनिर्मित व नवीन शिकण्याची आवड जोपासण्याचा सल्ला दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम विद्यालयातील शिक्षकांच्या उपस्थित करण्यात आला. याचे नियोजन जयश्री निंबारकर यांनी केले .तर सूत्रसंचालन गणेश वाळुंज यांनी केले. कार्यक्रमला भिमराव जगताप व श्रीमती विठाबाई घागरे यांचे सहकार्य लाभले.