- १५ जानेवारीला मतदान तर, १८ जानेवारीला मतमोजणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२०) :- कोरोनाचे संकट आणि लाॅकडाऊन यामुळे रखडलेल्या जिल्ह्यातील तब्बल पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे ७४८ ग्रामपंचायतींचा निवडणुक रणसंग्राम अखेर जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २३ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. तर १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात निम्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्याने संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड -९१, भोर-७३, शिरूर-७१, जुन्नर-६६, पुरंदर-६८, इंदापूर-६०, मावळ – ५७, हवेली- ५४, बारामती- ५२, दौंड – ५१, मुळशी – ४५, वेल्हा – ३१, आंबेगाव- २९, पिंपरी-चिंचवड-१ अशा तालुकानिहाय एकूण ७४८ ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे.
तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करणे १५ डिसेंबर, उमेदवारी अर्ज दाखल करणे २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर, उमेदवारी अर्जांची छाननी ३१ डिसेंबर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ जानेवारी २०२१, मतदान १५ जानेवारी २०२१ तर मतमोजणी १८ जानेवारी रोजी होणार आहे.