- दुय्यम निबंधक कार्यालयाच्या कामकाजांना ३१ डिसेंबरपर्यंत ‘स्पीड’ …
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२०) :- शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यवसायाला उभारी देण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत स्टॅम्प ड्युटीवर ३ टक्के सवलत जाहीर केली आहे. या विशेष सवलतीचा नागरिकांना लाभ मिळावा, यासाठी सर्व शासकीय सुट्टीच्या दिवशी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरू राहणार आहे.
मुद्रांक शुल्क सवलतीचा सर्वसामान्य जनतेला लाभ घेता यावा यासाठी जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालये १२, १९, २५ व २६ डिसेंबर या शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी सुरू ठेवणार आहेत, असे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दिलीप पाटील यांनी सांगितले.
सह दुय्यम निबंधक बारामती, सह दुय्यम निबंधक बारामती क्र .२, दुय्यम निबंधक आंबेगाव, दुय्यम निबंधक भोर, दुय्यम निबंधक दौंड, दुय्यम निबंधक इंदापूर, नारायणगाव, केडगाव, दुय्यम निबंधक खेड, दुय्यम निबंधक खेड क्र. २, खेड क्र. ३, लोणावळा, मावळ, मावळ क्र. २ दुय्यम निबंधक मुळशी, दुय्यम निबंधक जुन्नर, दुय्यम निबंधक पुरंदर, दुय्यम निबंधक शिरुर, दुय्यम निबंधक तळेगाव ढमढेरे, दुय्यम निबंधक वेल्हा ही कार्यालये सुरू राहणार आहेत.