- राज्य सरकारकडून हस्तक्षेपाची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२०) :- कोरोनामुळे केवळ पालकांनाच आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही तर शाळांचीही आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. खासगी माध्यमाच्या इंग्रजी शाळांना आता ऑनलाईन शिक्षण सुरु ठेवणेही अश्यक्य झाले आहे.
या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी फेडरेशन ऑफ स्कूलस् असोसिएशन ऑफ महाराष्ट्रातर्फे पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा तीन दिवस बंद ठेवल्या जाणार आहे. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेल्याने शाळांनी शुल्कासाठी तगादा लावू नये, असे परिपत्रक राज्याच्या शिक्षण विभागातर्फे प्रसिद्ध केले.
त्यामुळे शाळांनी पालकांना शुल्क भरण्यास सवलत दिली. परंतु, आर्थिक स्थिती चांगली असणारे पालकही शाळांचे शुल्क भरत नसल्याचा दावा फेडरेशन ऑफ स्कूलस् असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.