न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ डिसेंबर २०२०):- ऑईंल कंपन्यांनी एलपीजी (LPG Prices) सिलिंडरच्या किंमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढविली आहे.
अशाचप्रकारे ५ किलोग्रॅम छोट्या सिलिंडरच्या किंमतीत १८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे १ डिसेंबरला कोणतीही वाढ केली नव्हती. तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलिंडरचे दर ठरवितात.
प्रत्येक राज्यात कर वेगवेगळा असल्याने त्यानुसार गॅस सिलिंडरच्या दरात फरक असतो. नेहमी प्रमाणे 1 डिसेंबरलाही गॅस कंपन्यांनी दराचा आढावा घेतला होता. यानुसार घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात नोव्हेंबरच्या किंमतीत काही बदल करण्यात आलेला नव्हता.