- विभागीय आयुक्तांकडे ३० दिवसांच्या आत द्यावे लागणार लेखी कारण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२०) :- पुणे महापालिका हद्दीमध्ये २३ गावे समाविष्ट करण्याबाबतची प्रारूप अधिसूचना राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने बुधवारी (दि. २३) जाहिर केली.
याव्दारे पुणे महापालिका हद्दीत शहरालगतची २३ गावे समाविष्ट करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. मात्र ही गावे महापालिका हद्दीतील भाग बनावी की नाही, याकरिता हरकती व सूचना ( आक्षेप ) दाखल करण्यास पुढील एक महिन्याचा कालावधी दिला आहे.
राज्य शासनाच्या या अधिसूचनेस म्हणजेच पुणे महापालिकेत २३ गावे समाविष्ट करण्याच्या निर्णयास आक्षेप घेण्यासाठी पुढील ३० दिवसांच्या आत पुण्याचे विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी कारणे सादर करणे आवश्यक आहे.