- जमावबंदीचे कलम १४४ लागू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०२०) :- पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगावसह अकरा गावामध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२१ पर्यंत नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी काढले आहे. भीमा कोरेगावमध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभास १ जानेवारी रोजी दरवर्षी लाखोंचा जनसमुदाय येत असतो. मात्र यंदा करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वर्षभरामध्ये आपण सर्व सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले आहे.
हे लक्षात घेऊन, भीमा कोरेगावच्या आसपास भागातील लोणीकंद, पेरणे, तुळापूर, बकोरी,वढू खुर्द, केसनंद, कोलवडी, डोंगरगाव, फुलगाव, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या गावांमध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२१ सकाळी सहा वाजेपर्यंत बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे.