- जीएसटी दरमहा भरणा आता तिमाही भरण्यास सवलत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०२०) :- केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाने (सीबीआयसी) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विवरणपत्र दरमहाऐवजी तिमाही भरण्यास मुभा दिली आहे. नव वर्षापासून हा निर्णय लागू होणार असून, त्याचा फायदा देशातील ९४ लाख (९२ टक्के) करदात्यांना होणार आहे.
उलाढालीवरील जीएसटी कर दरमहा भरण्याची परवानगी आणि विवरणपत्र तिमाही भरण्याची मुभा सीबीआयसीने दिली आहे. यापूर्वी वर्षभरात बारा विवरणपत्र भरावी लागत होती. ती संख्या आता चारपर्यंत कमी करण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यामध्ये समाधानाची भावना आहे
यासाठी गेल्या आर्थिक वर्षांत पाच कोटींपेक्षा कमी उलाढाल असलेले चालू आर्थिक वर्षातील कोणत्याही तिमाहीत पाच कोटींपेक्षा जास्त उलढाल झाल्यास पुढील तिमाहीत अपात्र – संकेतस्थळावर नोंदविलेल्या बीजकांवर आधारित रकमेवर इनपुट टैक्स क्रेडिट मान्य होणार आहे.