- पिंपरी चिंचवड शहरातील इ. वी ९ ते १२ वी च्या शाळा ४ जानेवारीपासून सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०२०) :- कोविड १९ रुग्णांच्या संख्यामध्ये होत असलेली वाढीची परिस्थिती लक्षात घेऊन दि. ०३ जानेवारी २०२१ अखेरपर्यंत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमधील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या सर्व शाळा/महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला होता. मात्र, आता आयुक्तांनी शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करुन महानगरपालिका क्षेत्रातील इ. वी ९ ते १२ वी ची शाळा व महाविद्यालय दि. ४ जानेवारी २०२१ पासून चालू करण्याचा आदेश पारित केला आहे. याबाबत त्यांनी काही मार्गदर्शक सुचना व अटींच्या अधीन राहून शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
शाळा सुरु करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचेमार्फत दिनांक १० नोव्हेंबर २०२० रोजी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना व अटी (SOP) ने पालन करणे बंधनकारक राहीन. शाळेत स्वच्छता व निर्जतुकीकरण सुनिश्चित करणेकामी Thermometer, Thermal विषयक सुविधा Scanner / Gun, Pulse Oximeter, जंतूनाशक इत्यादी आवश्यक वस्तूंची उपलब्धता असलेची दक्षता घ्यावी.
शाळा वाहतूक सुविधांचे निर्जंतुकीकरण नियमित होत असलेबाबत व याबाबत उपाययोजना केली आहे किंवा नाही याची शाळा व्यवस्थापनाने पडताळणी करणे आवश्यक राहील. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी कोविड – १९ साठीची RTPCR चाचणी बंधनकारक असून चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळेत दप्तरी ठेवणेत यावे. वर्गखोली तसेच स्टाफरुममधील बैठकीव्यवस्था शारीरिक अंतर (Physical Distance) च्या नियमानुसार असावी.
शाळेच्या दर्शनी भागावर (Physical Distance), मास्कचा वापर आदी संदर्भात मार्गदर्शक सूचना Posters / Slickers लावले का? शाळेच्या अंतर्गत व बाह्य परिसरामध्ये रांगेत उभे राहण्याकरिता किमान ६ फुट इतकी शारीरिक अंतर (Physical Distance) राखले जाईल याकरिता विशिष्ट चिन्ह लावली आहे का? शारीरिक अंतर (Physical Distance) राखण्यासाठी येण्या व जाण्याचे वेगवेगळे मार्ग निश्चित करणा-या बाणाच्या खुणा केल्या आहेत का? याबाबतची व्यवस्था करणे आवश्यक राहील.
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी त्यांच्या पालकांची लेखी सहमती शाळा प्रमुखांनी प्राप्त करुन घेण्यात यावी. शाळेत व शाळेच्या परिसरात स्वच्छता व आरोग्यदायी परिस्थिती राखण्याकरीता शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जातो का? स्वच्छतागृहांचे वारंवार निर्जंतुकीकरण केले जाते याबाबतची शाळेच्या मुख्याध्यापकांनी खात्री करून घेणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी शाळा वाहतुकीच्या वाहनांचे दिवसातून किमान दोन वेळा (विद्यार्थी वाहनात बसण्याअगदोर व उतरल्यानंतर) निर्जंतुकीकरण केले जाते का? याची खातरजमा शाळा व्यवस्थापनाने करुन घेणेत यावी, अशा बाबींची शाळा व्यवस्थापनाला पूर्तता करावी लागेल.