- भारतीय दंड संहिता ४२० अंतर्गत आर्थिक फसवणुक व फौजदारी गुन्हे दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी दि. ०६ जानेवारी २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेने अखेर एफडीआर (परफॉर्मन्स डिपॉझिट रिसीट) व बँक गॅरंटीचे बोगस (प्रमाणपत्र सादर करणाऱ्या १८ पैकी ५ दोषी ठेकेदारांवर भारतीय दंड संहिता ४२० अंतर्गत आर्थिक फसवणुकीचा व फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. उर्वरित ठेकेदारांवर लवकरच गुन्हे दाखल करणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.
दरम्यान, १८ पैकी पाटील अॅण्ड असोसिएटस, डी. डी. कन्स्ट्रक्शन, एस. बी. सवई, वैदेही कन्स्ट्रक्शन आणि कृती कन्स्ट्रक्शन या ५ ठेकेदारांविरुद्ध पिंपरी पोलिस ठाण्यात सोमवारी (दि. ४) तक्रार देण्यात आली.
आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशावरून कार्यकारी अभियंता बी. सुनील वायुंडे यांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. त्यानुसार पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.