- लॉकडाऊनमध्ये कंटाळलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खुलले हास्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंरी (दि. ०७ जानेवारी २०२०) :- पिंपळे सौदागर येथील हभप पांडुरंग काटे प्रतिष्ठान संचालित पी के इंटरनॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांचे नुकतेच स्वागत करण्यात आले.
कोरोनामुळे अनेक महिने विद्यार्थी घरातुन ऑनलाइन शिक्षण घेत होते. शाळा कधी सुरू होईल याची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली होती. अखेर प्रशासनाने शाळा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत प्रवेश मिळाला.
विद्यार्थ्यांची शाळेत प्राथमिक स्तरावर तपासणी करण्यात आली. यावेळी शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे, मुख्याध्यापिका दिपाली जुगुळकर, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.