- पत्नीकडून सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२१) :- पिंपळे सौदागर येथे एका पतीने पत्नीसोबत हनिमुनच्या वेळी पत्नीचे काढलेले अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. याप्रकरणी ३७ वर्षीय पतीच्या विरोधात विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पिंपळे साैदागर येथे हा प्रकार घडला.
याबाबत पत्नीने बुधवारी (दि. ६) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी हनिमुनच्या वेळी अर्धनग्न फोटो काढले होते. ते फोटो पतीने पत्नीची संमती न घेता फेसबुकवर अपलोड केले. तसेच त्या फोटोखाली ओपन रिलेशनशिप असे लिहून फिर्यादीच्या मनास लज्जा निर्माण करून तिचा विनयभंग केला. संबंधित फेसबुक अकाउंटचा पासवर्ड पतीला माहिती होता. तो पासवर्ड पतीने बदलला.