न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२१) :- विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला सांगवी पोलिसांनी अटक केली. बुधवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास पिंपळे सौदागर परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली.
शुभम महादेव खडसे (वय २२, रा. नखाते वस्ती, रहाटणी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा पिंपळे सौदागर स्मशानभूमीजवळ एका हॉटेलशेजारी विनापरवाना पिस्तुलासह वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.