- इंद्रायणीनगरमधील घटना; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जानेवारी २०२१) :- टपरीवरील कामगाराला धमकी दिल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणावर दोघांनी कोयत्याने वार केले. ही घटना गुरुवारी (दि. ७) दुपारी इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडली.
सौरभ पिसे, निखिल बांगर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. दीपक उमाकांत पटणे (२५, रा. भोसरी, मूळ रा. बिदर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी पटणे यांच्या भावाची इंद्रायणीनगर येथे पानटपरी आहे. त्यावर राजू म्हेत्रे काम करतो. आरोपींनी त्याला धमकी दिली. त्यामुळे फिर्यादी पटणे यांनी आरोपीला जाब विचारला. त्यावरून आरोपींनी त्यांच्यावर वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलिस तपास करीत आहेत.