- महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जानेवारी २०२१) :- चहात गुंगीचे औषध टाकून महिलेवर बलात्कार केला. तसेच महिलेचे अश्लील फोटो व व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच महिलेला व तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली.
चिंचवड, बीड जिल्ह्यासह इतर ठिकाणी २७ फेब्रुवारी २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी पीडित महिलेने शनिवारी (दि. ९) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
राहुल किसन जाधव (वय २७, सध्या रा. घोरपडी, पुणे, मूळ रा. बीड), किसन रेखाजी जाधव (रा. आंबेजोगाई, बीड), संजय राठोड (रा. परळी, बीड) यांच्यासह अन्य दोन महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपी राहुल याने महिलेच्या चहामध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्यावर बलात्कार केला. महिलेचे अश्लील फोटो व व्हिडीओ काढून ते सोशल मीडियावर टाकण्याची तसेच फिर्यादीला व तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, अन्य आरोपीनी धमकी देत फिर्यादीवर दबाव टाकण्याचा प्रयल केला.