- शासकीय कामात अडथळा; तरूणाविरोधात गुन्ह्याची नोंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११. जानेवारी २०२१) :- सिग्नल तोडण्याच्या वादातून एका तरुणाने पोलिसाला मारहाण केली. तसेच, स्वतःवर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. ९) दुपारी दोनच्याव सुमारास देहूफाटा, मोशी येथे घडली. याबाबत अक्षय बलभीम जाधव (३०, रा. महादेवनगर, चिखली) याच्यासह धीरेंद्र प्रतापसिंग (रा. देहूगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय ठिगळे (वय ५२) यांनी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ठिगळे हे भोसरी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. शनिवारी ठिगळे, पोलिस नाईक रोकडे आणि ट्राफिक वॉर्डन मोशी येथील देहूफाटा चौकात वाहतुकीचे नियमन तरुणासह करीत होते. त्यावेळी आरोपी रिक्षातून जात होते.
अक्षय सिग्नलकडे दुर्लक्ष करून रिक्षा पुढे घेऊन जाऊ लागला असता ट्राफिक वॉर्डन तोडसम यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. अक्षय याने वॉर्डन सोबत हुज्जत घालून शिवीगाळ केली. तसेच, पोलिस नाईक रोकडे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर फिर्यादी ठिगळे आले असता आरोपीने त्यांना मारहाण केली. आरोपी अक्षय याने त्याच्याकडील दारूची बाटली फोडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला अडवत असताना ठिगळे देखील जखमी झाले. आरोपींवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.