न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२१) :- राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून हिंदवी स्वराज्याचा पाया रचणाऱ्या शक्तीस्थान, ऊर्जास्थान, प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली.
भोसरीतील लांडेवाडीत राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवती अध्यक्षा वर्षा जगताप, हीना अत्तार, नेहा पडवळ, शलाका बनकर, सारिका ढामे, राजश्री, रविराज काळे आदी उपस्थित होते.