- किरकोळ भांडणातून तरुणाने जवळपास दहा वाहनांची केली जाळपोळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२१) :- चिंचवडगावातील काकडे टाऊनशिप येथे बुधवारी पहाटे दोन तरुणांमध्ये झालेल्या भांडणातून एका तरुणाने जवळपास दहा वाहनांची जाळपोळ केली. दोन तरुणांनी एकत्र कॅमेरा घेतला होता. मात्र एक तरुण त्यातील कॅमेराचे हप्ते देत नसल्याने दुस-या तरूणाने कॅमेरा स्वत:कडे ठेवून घेतला. यामधून दोन तरुणांमध्ये जोरदार भांडण झाले. बदला घेण्यासाठी एका तरुणाने दुसऱ्या तरुणाची गाडी जाळली. मात्र पेटवलेल्या गाडीमुळे इतर दहा दुचाकी आगीच्या संपर्कात आल्याने त्या जळून खाक झाल्या आहेत.
नागरिकांनी अग्निशामकशी संपर्क साधला. अवघ्या काही मिनिटातच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ही आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत दहा गाड्या जळून खाक झाल्या होत्या. सीसीटीव्ही फुटेज वरून घटना उघडकीस आली ज्या इमारतीमध्ये वाहनांची जाळपोळ करण्यात आली त्या इमारतीमध्ये काही महिन्यांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. रहिवाशांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर गाड्या जळणारा तरुणाचा शोध लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे.
यात सीसीटीव्हीचे किमान ४० ते ५० हजारचे नुकसान झाले आहे. लाईट फिटिंग व बाथरुम व अन्य असे किमान २ लाख रुपये फक्त सोसायटीचे नुकसान झाले आहे. सोसायटीतील लोक दहशतीखाली आहेत.