- भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब मंत्रालयाच्या लसीकरण विभागाकडून परिपत्रक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३. जानेवारी २०२१) :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम दि. १७ जानेवारी २०२१ रोजी आयोजीत करण्यात आली होती. परंतु दि. १७ जानेवारी २०२१ रोजी होणारी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम पुढील सुचना येईपर्यंत पुढे ढकलण्यात येत आहे, अशी माहिती भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या लसीकरण विभागाचे सल्लागार (आर.सी.एच.) प्रदिप हलदार यांनी दि. १ जानेवारी २०२१ रोजीच्या परिपत्रकाव्दारे दिली आहे.
त्यामुळे शासन आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम दि. १७ जानेवारी २०२ रोजी होणार नसून ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. शासनाकडून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची पुढील तारीख प्राप्त प्राल्यानंतर प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात येईल, असे पिपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकिय विभागाकडून कळविण्यात आले आहे.