- रिक्षा व तीन दुचाकींची चोरी झाल्याची शहरातील विविध पोलीस चौकीत नोंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जानेवारी २०२१) :- नोकरीसाठी मुलाखतीला गेलेल्या उमेदवाराची संबंधित कंपनीच्या वाहनतळातून दुचाकी चोरीस गेली. या घटनेसह रिक्षा आणि तीन दुचाकींची चोरी झाल्याची नोंद शहरातील विविध पोलीस ठाण्यात झाली आहे. कासारवाडी येथील पीडीसीसी बँकेसमोर लावलेली सत्तर हजार रुपये किमतीची रिक्षा चोरट्यांनी नेली. कमरुद्दीन सिराजुद्दीन मोहम्मद (वय २६, रा. पीडीसीसी बँके शेजारी, कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
टाटा मोटर्स कंपनीमध्ये मुलाखतीसाठी गेलेल्या युवकाची दुचाकी चोरीस गेली. अविनाश धनंजय भोसले (वय २४, रा. तळेगाव दाभाडे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. भोसले नऊ जानेवारी रोजी कंपनीत मुलखतीसाठी आले होते. त्यांनी मटेरियल गेटच्या वाहनतळात दुचाकी लावलेली होती. तेथून वाहन चोरीला गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
भोसरीतील पीएमपी बस थांब्या समोरील पुलाखाली लावलेली दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार बाळासाहेब बळीराम साबळे (वय २१, रा. बौद्धनगर झोपडपट्टी, पिंपरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात दिली आहे. भोसरीतून दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार अंकुश गेणभाऊ डामसे ( वय ३५ , रा.भोसरी ) यांनी दिली आहे .