- वाहनाची तोडफोड; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएसमी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२१) :- कामावरून काढल्याचा राग मनात धरून एका कामगाराने आपल्या साथीदाराच्या मदतीने कंपनीच्या अधिकाऱ्यास दगडाने मारहाण केली. तसेच मोटारीचीही तोडफोड केली. ही घटना मंगळवारी (दि. १२) सायंकाळी एमआयडीसी भोसरी येथे घडली.
मनोज साळवे आणि त्याचे तीन साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. कार्तिक कल्याण अय्यर (३९, रा. बाणेर रोड, औंध, पुणे) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी बुधवारी (दि. १३) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी अय्यर हे मंगळवारी सायंकाळी आपल्या मोटारीतून घरी चालले होते. दरम्यान, सव्वा सहाच्या सुमारास त्यांची मोटार भोसरी एमआयडीसीतील फर्माइश हॉटेलसमोर आली असता आरोपी मनोज साळवे आणि त्याच्या साथीदारांनी अडविली. मला कामावरून का काढले, अशी विचारणा साळवे याने केली. त्यानंतर साळवे याने आपल्या साथीदारांच्या मदतीने अय्यर यांच्या मोटारीची दगडाने तोडफोड केली.