- पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद; तिघांवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जानेवारी २०२१) :- चिंचवड एमआयडीसी डी ब्लॉकमध्ये असलेली जागा विक्रीचे अधिकार आरोपींनी आपसात संगनमत करून वालीया यांच्याकडे दिले. २२ नोव्हेंबर २०१८ रोजी नागिया यांनी फिर्यादी शिंदे, प्रकाश सरोदे आणि प्रकाश तांबे यांची बैठक घेतली. त्यात २ हजार ८२५ रुपये प्रति स्क्वेअर फूट प्रमाणे सतीश शिंदे यांना ७ हजार ३०० स्क्वेअर फूट आणि सरोदे यांना ५ हजार ८५० स्क्वेअर फूट जागा विकण्याचे ठरवले.
ठरलेल्या दरानुसार शिंदे आणि सरोदे यांनी वेगवेगळ्या बँकेच्या माध्यमातून ४ कोटी ३९ लाख ५० हजार रुपये दिले. त्यानंतर आरोपींनी शिंदे यांना जागेचा ताबा दिल्याचे पत्र दिले. मात्र प्रत्यक्षात जागेचा ताबा दिला नाही. त्यानंतर आरोपी वालीया यांनी त्याच जागेचा भाव ३ हजार ५०० रुपये प्रति स्क्वेअर फूट प्रमाणे वाढवून नवीन दराने नवीन व्यवहार कारण्यास सांगीतले. यासाठी शिंदे आणि सरोदे यांनी नकार दिला असता त्यांनी खरेदी केलेल्या जागेत येण्यास आरोपींनी मज्जाव केला. तसेच शिंदे आणि सरोदे यांच्याकडून घेतलेल्या ४ कोटी ३९ लाख ५० हजार रुपयांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून त्यांची फसवणूक केली.
याबाबत सतीश एकनाथ शिंदे (वय ४५, रा. प्राधिकरण, चिखली) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नीरज वालीया, विरेंद्रकुमार नागीया (रा. बाणेर, पुणे), अजित शितो यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.