- आकुर्डीत संत नामदेव महाराज वारकरी भवन उभारा..
- महाराष्ट्र वारकरी महामंडळाकडून महापौर माई ढोरे यांना मागण्यांचे निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून जाणाऱ्या मेट्रोच्या सिमेंट पीलरवर सर्व संतांचे मिरलमधील चित्र आणि अभंग लावण्याची मागणी महाराष्ट्र वारकरी महामंडळ यांच्याकडून महापौर माई ढोरे यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आलेली आहे. अशीच मागणी शहरातील आमदार व खासदार यांच्याकडेही निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
पालिकेच्या महापौर ढोरे यांना निवेदन देताना महाराष्ट्र वारकरी महामंडळ पिंपरी चिंचवड अध्यक्ष विजु अण्णा जगताप, हभप चंद्रकांत महाराज वांजळे, हभप सतीश महाराज काळजे, नगरसेवक सुरेश भोईर, माजी नगरसेवक आप्पा बागल, विठ्ठल रुक्मिणी वारकरी मंडळ पिंपळे सौदागर माजी अध्यक्ष संजय भिसे, हभप तानाजी काळभोर, हभप वसंत कलाटे, विकास काटे आदी उपस्थित होते.
निवेदनात त्यांनी पुढील मागण्या उल्लेखित केल्या आहेत. शहरात नियोजित मेट्रो सुरू होत आहे. त्या सर्व पोलवर (सिमेट पिलर) सर्व संताचे म्युरलमधील चित्र आणि अभंग लावावेत. या मेट्रो मार्गाचे (पुल) पालखी सोहळयाचे जनक तपोनिधी श्री नारायण महाराज सदगुरू श्रीहैबद बाबा महाराज आरफळकर सेतु असे नामकरण करण्यात यावे. वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वानंद सुखनिवासी श्री जोगमहाराज (सदगुरू श्रीविष्णुबुवा जोग) हे पैलवान होते. त्यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या पिंपरीगावातील वाड्याला निलफलक लावणे तसेच पिंपरीगाव येथे त्यांचा पुतळा तसेच प्रवेशव्दार उभारावा. मनपा दरवर्षी अनेक थोरामोठ्यांच्या जयंती पुण्यतिथी उत्सव संपन्न करित असते. त्याच विचारधारेप्रमाणे दरवर्षी “वारकरी संमेलन /अखंड हरिनाम सप्ताह यांचे नियोजन करण्यात यावे. संत श्री तुकाराम महाराजाची पालखीचा पहिला मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठलमंदीर येथे होत असतो. वाढत्या शहरीकरण नागरीकरणामुळे पालखीतील दिंडयाना, वारकरी मंडळी, फडकरी यांना निवासाकरिता जागेची अडचण भेडसावत आहे. आकुर्डी येथील से. २८ शेजारी मनपा करसंकलन विभाग कै. पांडुरंगबुवा काळभोर सभागृह येथील इमारतीवर संत नामदेव महाराज वारकरी भवन उभारणे बाबत उचित कार्यवाही व्हावी सदर इमारतीत पालखी मुक्कामी दिंडी फडकरी वारकरी विशेषता महिला दिंडयाना निवासाची व्यवस्था होऊ शकते. सदर ठराव यापुर्वी अ प्रभाग समिती मनपा सन २००२ ते २००७ या काळात संमत झालेला आहे.