- महाविकास आघाडी सरकारकडून पालिका आयुक्तांना फतवा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अनधिकृत बांधकाम केलेल्या नागरीकांना (विशेषत: रेडझोनमधील) शास्तीकर भरणेबाबत मिळकत जप्तीच्या नोटीसा पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील आर्थिक अडचणीत असलेले सर्व सामान्य नागरीक चिंताग्रस्त आहेत.
स्थनिक विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकारकडे पाठपुरावा केला होता. विरोधी पक्षाच्या मागणीची दखल घेऊन शास्तीकर वगळून सामान्य कर वसूल करण्याचे आदेश राज्य शासनाने महापालिका आयुक्तांना आज दिले आहेत, अशी माहिती शहर राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे उपस्थित होते.
आदेशात महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून आयुक्त, पिं.चिं.मनपा यांना नागरीकांकडून शास्तीकर वगळून मुळ मिळकतकराचा भरणा स्विकृत करण्याच्या प्रस्तावास दि. ३१ मार्च २०२१ पर्यंत विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे.