न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५. जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शुक्रवारी (दि. १५ जानेवारी) रोजी १४७ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १२२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे ०३ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेले रुग्ण हे ०२ पुरुष – काळेवाडी (८१ वर्षे), वडमुखवाडी (८३ वर्षे), ०१ स्त्री – थेरगाव (८० वर्षे) येथील रहिवासी आहेत. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९८६२८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९५२६२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७८५ जणांचा मृत्यू झालेला आहे.