- नेहरूनगरचे जम्बो कोविड रुग्णालय बंद करण्याचा पालिकेचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२१) :- कोविड योद्ध्यांचा दीड महिन्यांचा पगार न करताच नेहरूनगर येथील जम्बो कोविड रुग्णालय बंद करण्याचा निर्णय शुक्रवारी (दि. १५) घेण्यात आला. सरकारच्या सुचनेनुसार रुग्णालय बंद करण्याची कार्यवाही राज्य केली असल्याचे महापालिका वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.
कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नसताना रुग्णालयाकडून राहण्याची व्यवस्था केलेले खासगी हॉटल व अन्य ठिकाण त्यांना सोडण्यास सांगण्यात आले. त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले होते. त्यांनी याबाबत रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
सध्या रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका, प्रशासकीय कर्मचारी, फार्मसी, हाऊसकीपिंग, वॉर्डबॉय, रुग्ण समुपदेशक (एमएसडब्ल्यू), स्टोअर विभाग येथील कर्मचारी असे एकूण ५५० जण कार्यरत होते. त्यांचा डिसेंबर महिन्यातील पूर्ण पगार आणि जानेवारी महिन्यातील १५ दिवसांचा पगार अद्याप दिलेला नाही. त्यामुळे कर्मचारी संतप्त झाले होते. त्यांनी याबाबत रुग्णालयाच्या मुख्य व्यवस्थापिका डॉ. प्रिती व्हिक्टर यांची भेट घेऊन त्यांना याबाबत विचारणा केली.