- शहरात आज ११० जणांना कोरोनाची बाधा; १५० रुग्णांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज शनिवारी (दि. १६ जानेवारी) रोजी ११० जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १५० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे एकही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९८७३८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९५४१२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७८५ जणांचा मृत्यू झालेला आहे.