मावळचे आमदार सुनिल शेळके यांचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२१) :- मावळ तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या ३१६ जागांची मतमोजणी सोमवारी (दि.१८) सकाळी १० वाजता सुरु होवून दुपारी १:३० वा मतमोजणी संपली. यात ४९ ग्रामपंचायतीपैकी ४० ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडी पॅनलचे वर्चस्व असल्याचे मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी सांगितले. तर भाजपने ३९ ग्रामपंचायतीवर दावा सांगत आहेत.
५७ ग्रामपंचायतीपैकी सोमाटणे, नवलाख उंब्रे, येलघोल, आंबेगाव, पाचाणे, कुसगाव पमा, दारूंब्रे व आढे या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ३१६ जागांसाठी ७११ उमेदवार होते. मावळ तालुक्याच्या इतिहासात प्रथमच तळेगाव दाभाडे येथील पै. विश्वनाथ भेगडे क्रीडा संकुल येथे मतमोजणी झाली.
सकाळी ८ वाजल्यापासून ४९ ग्रामपंचायतीचे उमेदवार, उमेदवार प्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते. एसआरपीएफचे २५ सशस्त्र जवान व सहा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील २०० पोलीस तैनात होते. मतमोजणी होण्याच्या अगोदर उत्सुकता ताणली गेली होती. जसे जसे निकाल बाहेर येत गेले तसे तसे गर्दी ओसरली.