- आज ८१ जणांना कोरोनाची बाधा; चौघांचा मृत्यू तर, १४८ रुग्णांना डिस्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. १९ जानेवारी) रोजी ८१ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १४८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरीतील ६० वर्षीय व चिंचवडमधील ६५ वर्षीय स्त्रीयांचा तर, हद्दीबाहेरील कात्रजमधील एका ४८ वर्षीय पुरुष तसेच जुन्नरमधील ९० वर्षीय स्त्रीचा मृत्यू झालेला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ९९०२९ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९५७७१ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १७८९ जणांचा मृत्यू झालेला आहे.