- मार्च २०२१ अखेर रॅम्प खुला करण्याची उपमहापौरांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील कासारवाडी येथील जे. आर. डी. टाटा उड्डानपुल पिंपळे गुरव ते पुणे या मार्गाचे कामकाज पुर्ण झाले असून तो गेल्या ८ वर्षापासुन बंद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कालावधीत १२ कोटी रुपये खर्च करुन देखील रॅम्प बंद अवस्थेमध्ये आहे. हा पुल हा चुकीच्या पध्दतीने बांधला गेला असुन त्यामध्ये तांत्रिक चुका झाल्याचे दिसून येत आहेत. या पुलाचा वापर तातडीने सुरु होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याने याकामी उपमहापौर दालनामध्ये बैठक आयोजित केलेली होती.
या बैठकीत उपमहापौर केशव घोळवे, महामेट्रोचे अधिकारी जवाहर साळुंके, वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरिक्षक दिघे, मनपाचे कार्यकारी अभियंता सवणे आणि प्रमोद ओंबासे आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये महामेट्रोचे अधिकारी साळुंके यांनी सदरचा उड्डाणपुल जून २०२१ अखेर चालू करण्यात येईल. असे सांगितले. तसेच उपमहापौर यांनी नाशिक फाटा चौक सिग्नल फ्री ही संकल्पना राबवुन मार्च २०२१ अखेर उडडानपुलाचा रॅम्प चालू करणेबाबत सूचना दिल्या. जेणेकरुन निगडी ते पुणे या प्रवासामध्ये नागरीकांचा वेळ वाचेल व अपघात होणार नाहीत. तसेच कासारवाडी येथील महामेट्रो चालू असलेल्या मार्गवरील रस्ता तातडीने दुरुस्ती करण्यात यावा, अशा सूचना यावेळी उपमहापौर घोळवे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.