- शहरातील शाळा सुरु करण्याबाबत अद्याप कोणताच निर्णय नाही…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२१) :- राज्यभरात पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत. परंतु शहरात २७ जानेवारीपासून शाळा सुरु करण्याबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
याबाबत शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता शहरामध्ये पाचवी ते सातवीचे वर्ग सुरू करण्याबाबत महापौर उषा ढोरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
शहरामध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरू झालेले आहेत. त्या पाठोपाठ आता पाचवीचे ते आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत राज्य सरकारचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यासाठी लवकरच एक बैठक बोलाविण्यात येणार आहे. पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र, शाळांचे निर्जंतुकीकरण, शिक्षकांची करोनाविषयक चाचणी तसेच करोना आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्या लागणार आहेत.