- पोलिसांकडून दोन महिलांची सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२१) :- पुणे – मुंबई महामार्गावर नाशिक फाट्याजवळ असलेल्या व्हीआयपी स्पा अँड ब्युटी येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी स्पा सेंटरवर छापा मारला.
त्यात दोन महिलांची सुटका केली. तसेच १२ हजार ७२० रुपयांची रोकड, १९ हजारांचे तीन मोबाईल फोन आणि ३५ रुपयांचे इतर साहित्य असा एकूण ३१ हजार ७५५ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी सीमा चरणदास शिंदे (वय ३५, रा. बिबवेवाडी, मार्केटयार्ड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.