- पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाचे पालिका आवारात आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जानेवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील कर्मचा-यांसाठी वरदायिनी असणारी धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करून खाजगी विमा पॉलिसी चालू करण्याबाबतचा आदेश दिनांक ०४/०१/२०२१ रोजी पारीत करण्यात आलेला होता.
धन्वंतरी स्वास्थ योजना बंद करण्यात येऊ नये यासाठी महासंघाने वेळोवेळी पालिका आयुक्तांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. आयुक्तांनी दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी एकतर्फी निर्णय घेतल्याने त्या निर्णयाविरुद्ध औद्योगिक न्यायालयात संघटनेच्यावतीने दाद मागण्यात आली.
महासंघाच्या वतीने मागणी केलेनुसार व सादर केलेल्या कागदपत्रानुसार मा.न्यायालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत धन्वंतरी योजना बंद करण्यात येऊ नये, असा अंतरिम आदेश दिनांक १९/०१/२०२१ रोजी पारित करण्यात आलेला आहे. पुढील सुनावणी दिनांक ८ फेब्रुवारी २०२१ रोजी होणार आहे. पिंपरी चिंचवड पालिकेची आज महासभा आहे. या सभेच्या विषय पटलावर विमा पोलीसी तरदूत वर्गीकरणाचा विषय आहे. या अनुषंगाने पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या वतीने अध्यक्ष अंबर चिंचवडे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरीतील महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर एक दिवसीय आंदोलन छेडण्यात आले आहे.