- नोव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये ध्वजवंदन संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२१) :- नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहण करून ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवड शहराचे एसीपी श्रीकांत डीसले हे उपस्थित होते.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधान निर्माण करण्याचं सर्वात मोठे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. २ वर्ष ११ महिने १८ दिवस ही समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान स्थापन करण्याचं काम करत होती. जगभरातल्या संविधानाचा अभ्यास करून जगभरात ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते आपल्या संविधानात इम्प्लिमेंट करण्याचा काम आंबेडकर यांनी केले आहे. २६ जानेवारी १९५० रोजी हे संविधान अमलात आणण्यात आले, तेच खऱ्या अर्थाने आजच्या दिवसाचे महत्त्व आहे, असे श्रीकांत डीसले यांनी सांगितले.
न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वाला धरूनच भारतीय नागरिकाचे धोरण असले पाहिजे. भारतीय संविधानाचे आकलन सुद्धा चांगले झाले पाहिजे स्वातंत्र्य आणि समता व बंधुता या विचारांना घेऊन आपण दैनंदिन जीवनात काम केले पाहिजे. लहान स्वप्न पाहणे हा गुन्हा आहे, त्यामुळे निश्चित मोठे स्वप्न पहा आणि ते नक्की पूर्ण होईल, असेसुद्धा एसीपी श्रीकांत देसले यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणात सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्राचार्य वैभव फंड यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संस्थेचे अमोल गोरखे, समीर जेऊरकर व शिक्षक वर्ग उपस्थित होता. आँनलाईनद्वारे २००० विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते.