न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२१) :- काळेवाडी येथील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळ संचलित श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय व एलबीटी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संचालक मोहन तापकीर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक मच्छिंद्र तापकीर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट सतीश घरत, माजी नगरसेविका अनिता तापकीर, सचिव सागर तापकीर, संचालक राजू पवार, नितीन पवार, दीपक चौधरी, मुख्याध्यापक शशिकांत वाखारे, नवनाथ गारगोटे, हर्षद परमार, निलेश शेंडगे, मुख्याध्यापिका रेणू वर्मा यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
बापू बल्लाळ यांनी सूत्रसंचालन केले तर पंकज देव यांनी आभार मानले.