- निकाल १५ जुलैला होणार जाहीर; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची माहिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२१) :- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) १० वी आणि १२ वीच्या परीक्षा ४ मेपासून सुरु होणार आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल यांनी याची माहिती सोशल मीडियामध्ये दिली.
१० वीच्या परीक्षा ७ जूनपर्यंत तर १२ वीच्या परीक्षा ११ जूनपर्यंत चालणार आहेत. दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाने cbse.gov.in या वेबसाइटवर दिले आहे.
देशात ओढवलेल्या कोरोना संसर्गाच्या संकटामुळे यंदा ही परीक्षा अडीच महिने उशिराने घेण्यात येत आहे. सुमारे ३० लाख विद्यार्थी ही परीक्षा देतील, असा अंदाज आहे. १० वी आणि १२ वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा १ मार्चपासून सुरू होतील तर दोन्हींचे निकाल १५ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.