- सल्लागार संतोष सौंदणकरांच्या अध्यक्षतेखाली नवीन पदाधिका-यांची नियुक्ती..
- नवीन सदस्यांनी केला संघटनेत जाहीर प्रवेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२१) :- महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेची राजगुरूनगर पुणे ग्रामीण विभागाची नवीन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. शिवसेना शहर संघटक तथा महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे सल्लागार संतोष सौंदणकर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन पदाधिका-यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सागर जोरी, कार्याध्यक्षपदी विकास साळुंके, उपाध्यक्ष विपुल मराठे, सहसचिव निलेश पाटील यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य विज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेची संघटण बांधणी जोरात सुरू आहे. राजगुरूनगर पुणे ग्रामीण विभागाच्या नवीन कार्यकारणीतील नवनियुक्त पदाधिका-यांना संतोष सौंदणकर यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले. यावेळी संघटनेत शाम केंद्रे, सचिन गोपाळे यांचा प्रवेश झाला. पुणे प्रादेशिक अध्यक्ष राजेश गाढवे, पुणे झोन अध्यक्ष मनोहर शिंदे, रास्तापेठ सर्कल अध्यक्ष अशोक पवार, रास्तापेठ सचिव उमेश काळे, मगर, कुमार, आप्पा डोळे, सुधीर बालुटकर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी संतोष सौंदणकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, विद्युत विभागात काम करणा-या सर्वच कर्मचा-यांनी कोवीड १९ च्या आपात्कालीन परिस्थितीमध्ये रात्रीअपरात्री सुध्दा नागरिकांना चांगली सेवा दिली. कोवीड सेंटर, रुग्णालयांमध्ये विद्युत प्रवाह खंडीत झाल्यास सर्व यंत्रणा ठप्प होत असते. अशा काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून वीज कर्मचारी, अधिका-यांनी कर्तव्य बजावले, याबद्दल त्यांचे अभिनंदन. येणा-या काळात आपले कर्तव्य बजावत असताना संघटनेचे कार्य सुध्दा आपल्याकडून तेवढ्याच प्रमाणिकपणे केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.