- मुलीचा बापावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. फेब्रुवारी २०२१) :- स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सन २०१७ ते सन २०२० दरम्यान पिंपरी येथे उघडकीस आला.
याप्रकरणी दहा वर्षीय पीडितेने मंगळवारी (दि. १६) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेत आरोपी बापाने घरात कोणी नसताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच, याबाबत कोठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली.