- घराचा कडी-कोयंडा तोडून किवळेत घरफोडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८. फेब्रुवारी २०२१) :- फिर्यादी शिंदे यांचे घर मंगळवारी (दि. १६) रात्री आठ ते बुधवारी पहाटे साडेतीन या कालावधीत कुलूप लावून बंद होते. त्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच अमेरिकन आणि सिंगापूर येथील डॉलर असा एकूण एक लाख १२ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
चोरट्यांनी चोरलेल्या अमेरिकन आणि सिंगापूरच्या डॉलरची भारतीय चलनातील किंमत सुमारे ३० हजार एवढी आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. १७) पहाटे साडेतीन वाजता उघडकीस आली.
सूर्यकांत वामन शिंदे (वय ६४, रा. विकासनगर, किवळे) यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.