- मूळ मालक, जागा विकत घेणा-यांसह सहा जणांवर फसवणुकीचा गुन्हा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२१) :- एकच जागा दोघांना विकल्याप्रकरणी मूळ मालक आणि जागा विकत घेणा-यांसह सहा जणांवर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सुमन ज्ञानेश्वर देवकुळे (वय ६२, रा. निगडी), कामिनी शंकर शिंदे (वय ६९, रा. मामुड), जयवंत विष्णू सदामते (वय ६९, रा. निगडी), श्यामराव गुलाबराव खुडे (वय ७१, रा. निगडी), सोमनाथ रामदास राक्षे (वय २७, रा. सांगवडे), योगेश गजानन राक्षे (वय २६, रा. सांगवडे) अशी आरोपींची नावे आहेत.
नलिनी रवींद्र पालव (वय ५४, रा. देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादींनी साई ओससिएट्सकडून २०१० मध्ये गहुंजे येथील चार गुंठे जागा विकत घेतली होती. त्यानंतर मूळ मालकांनी ही जागा सोमनाथ आणि योगेश राक्षे यांना विकली. संबंधित जागा पालव यांनी घेतली असल्याचे माहीत असूनही राक्षे यांना जागा खरेदी करून फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.