- तळवडेतील घटना; आरोपीवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२१) :- ठेकेदाराने एका महिलेला निर्जनस्थळी नेऊन विनयभंग केला. त्याचे चित्रीकरण साथीदाराने केल्याची घटना तळवडे स्मशानभूमी जवळ घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
नवनाथ आटपाडकर, नरेश चौधरी (दोघे, रा. गायकवाड वस्ती, कुरुळी, चाकण) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एका महिलेने फिर्याद दिली आहे. पिडीत महिला हाऊस किपींग कामगार पुरविण्याचे काम करते. त्याचे पैसे घेण्यासाठी संबंधित १६ फेब्रुवारी रोजी महिला गेली होती. आरोपींनी त्यांना दुचाकीवर बसविले, असे तक्रारीत म्हटले आहे.