- गॅस एजन्सीवर पोलिसांचा छापा; नव्वद हजारांचा मुद्देमाल जप्त…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ फेब्रुवारी २०२१) :- रावेत पोलिसांना सिद्धार्थ पुष्पा प्रायव्हेट गॅस एजन्सी नावाच्या दुकानात घरगुती वापराचा गॅस मोठ्या सिलिंडरमधून काढून चार किलोच्या सिलिंडरमध्ये धोकादायक पद्धतीने भरून त्याची बेकायदेशीर विक्री केली जात आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला.
या कारवाईत १७ हजार ६६० रुपयांची रोकड, १२ हजार २२० रुपयांचा गॅस मुद्देमाल, ३०० रुपये किमतीचे दोन पितळी रिफिल, २० हजार ५०० रुपयांचे दोन मोबाईल, ४० हजार रुपये किमतीची एक दुचाकी, असा एकूण ९० हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. रावेत येथे बुधवारी (दि. १७) दुपारी पावणेदोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोपट सोमा ढेकळे (रा. थेरगाव), असे आरोपीचे नाव आहे.