- सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२१) :- मदर डेअरीच्या वितरणाचे हक्क देतो असे सांगून एकाने ८ लाख ५ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी पोपट सजनराव भिसे (वय ५३, कल्पतरु हाऊसिंग सोसायटी, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मोबाईलधारकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने डेअरीचे वितरण हक्क देण्याची जाहिरात समाजमाध्यमावर दिली होती. त्यानुसार फिर्यादींनी संपर्क साधला. आरोपीच्या सांगण्यानुसार २० सप्टेंबर ते १२ डिसेंबर २०२० दरम्यान पैसे दिले. त्यानंतरही त्यांना वितरण हक्क मिळाले नसल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.