- दापोडीतील प्रसंग; महिला पोलिसाकडून गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२१) :- वाहतूक पोलीस महिला शनिवारी दापोडी येथील फुगेवाडी चौकात वाहतूक नियमन करत होत्या. त्यावेळी एका दुचाकी (एम एच १२ / ई वाय ५१६८) वरून तिघेजण आले. फिर्यादी यांना पाहून त्यातील एकजण काही अंतरावर उतरला. हा प्रकार फिर्यादी यांनी पाहिला. दुचाकीस्वाराला दंडाची पावती करण्यास सांगितले.
त्यावरून दुचाकीस्वाराने वाहतूक पोलीस महिलेला अश्लील भाषेत बोलून त्यांचा विनयभंग केला. तसेच पोलीस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार शनिवारी (दि. २०) दुपारी फुगेवाडी चौक, दापोडी येथे घडला.
याबाबत वाहतूक पोलीस महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आब्दुल सलाम अईनुल हक अन्सारी (वय ४८, रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे.