- कोरोना प्रतिबंध लसीकरणाचा टक्का वाढण्यास मदत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२१) :- शहरातील आठ केंद्रांवर १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान २२७७ फ्रन्ट लाइन वर्कर्सनी लस घेतली आहे. तर याच काळात ९३९ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. लस घेण्यात फ्रन्ट लाइन वर्कर आघाडीवर आहेत.
यामुळे शहरातील कोरोना प्रतिबंध लसीकरणाचा टक्का वाढण्यास मदत झाली आहे. शहरात ९ फेब्रुवारीपासून कोरोना काळात फ्रन्ट लाइनवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंध लस देणे सुरू झाले. शहरात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंध लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला.
पहिला डोस घेतल्यानंतर चार आठवड्यांच्या अंतराने दुसरा डोस घ्यावा लागतो. शहरात १५ फेब्रुवारीपासून दुसरा डोस देणे सुरू झाले आहे. १५ ते १९ फेब्रुवारीदरम्यान ६७० जणांनी दुसरा डोस घेतला आहे.