पिं. चिं. शहरात आज २९८ जणांना बाधा; एकाचा मृत्यू तर, ५८ जणांना डिश्चार्ज…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज रविवारी (दि. २१ फेब्रुवारी) रोजी २९८ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ५८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज कोरोनामुळे पिंपरी चिंचवड हद्दीबाहेरील चाकणमधील ७० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. पिं. चिं. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या १०३१९८ वर पोहोचली आहे. शहरातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ९८२५७ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे १८३० जणांचा मृत्यू झालेला आहे.