न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी – चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड गोरखनाथ गेणबा झोळ यांची निवड झाली आहे. शनिवारी (दि. २०) मोरवाडी येथील न्यायालयात असोसिएशनची सन २०२०-२१ निवडणूक पार पडली. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन १३ पदासाठी ही निवडणूक आयोजित करण्यात आली होती. सायंकाळी मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला.
अॅड गोरखनाथ झोळ (अध्यक्ष), अॅड पांडुरंग शिनगारे (उपाध्यक्ष), अॅड. महेश टेमगिरे (सचिव), अॅड. मोनिका गाढवे (सचिव), अॅड. अनिल शिंदे (सहसचिव), अॅड. धनंजय कोकणे (हिशोब तपासणीस), अॅड. हरीष भासुरे (खजिनदार), कार्यकारिणीच्या सदस्यपदी अॅड. ऋतुराज अल्हा, अॅड. दिनेश भोईर, अॅड. अमित गायकवाड, अॅड. मंगेश नढे, अॅड. प्राची शितोळे, अॅड. कृष्णा वाघमारे यांची निवड झाली आहे.
अॅड. गोरखनाथ झोळ हे प्रख्यात वकील तर आहेत. सोबतच सहकार क्षेत्रातीलही संगठन कौशल्य आणि नेतृत्त्वगुणांच्या जोरावर त्यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. नेहरुनगर येथील जागेत न्यायालय मे ते जून महिन्यापर्यंत स्थलांतरित करण्यासाठी अटोकाट प्रयत्न करु, असे ते न्यूज पीसीएमसीशी बोलताना म्हणाले.