न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. फेब्रुवारी २०२१) :- महाराज ग्रुप पिंपरी चिंचवड गडसंवर्धनाच्या वतीने शिवजंतीनिमित्त किल्ले तिकोणा गडावर साफ सफाईची मोहिम आयोजित करण्यात आली होती.
यावेळी पाण्याची टाकी साफ करण्यात आली. अडचण असणारे गवत, झाडे -झुडपे कापण्यात आले. झाडांचे कुपण व्यवस्थित करण्यात आले. अस्थावस्थ पडलेले दगडं व्यवस्थित रचण्यात आली.
या महिमेत संस्थापक अक्षय नाळे, प्रजाक नढे, शिवम खिल्लारी, आकाश नाळे, परमेश्वर त्रिमले, अतुल महाडिक, नारायण साळुंके, अभिजित शेटे, सुशील पोतदार, मरगळ, ऋषिकेश कांबळे, सचिन भोंडवे व आदी स्वयंसेवक सहभागी झाली होते. प्रसंगी ओमकार जाधव यांनी शिववंदना घेतली.