- आगीवर नियंत्रण; सुदैवाने जीवितहानी नाही, साहित्याचे मोठे नुकसान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२. फेब्रुवारी २०२१) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इमारती समोरील एका कॉम्प्लेक्समधील क्लिनिकला आज सोमवारी (दि. २२) रोजी पहाटे पहाटे सव्वापाचच्या सुमारास आग लागली.
अग्निशमन विभागाला माहिती मिळताच मुख्य केंद्राचा एक आणि प्राधिकरण उपकेंद्राचा एक असे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. या आगीत साहित्य जळाल्याने क्लिनिकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नाही. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.