- अपहरण करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रुवारी २०२१) :- चाकण (ता. खेड) येथून अपहरण झालेल्या चार महिन्यांच्या चिमुकलीचा शोध लावण्यात चाकण पोलिसांना यश आले. या बाळाला सुखरूप ताब्यात घेत अपहरण करणाऱ्या महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. राणी शिवाजी यादव (वय २८, रा. अंबाजोगाई, जि. बीड) असे तिचे नाव आहे.
फिर्यादीने एका तरुण – तरुणीच्या प्रेमसंबंधातून जन्माला आलेल्या या बाळाचे आई – वडील म्हणून स्वतःचे व पत्नीचे नाव बोगस पद्धतीने लावल्याची बाब तपासात समोर आली.
अधिक माहितीनुसार, चाकण येथून मागील बुधवारी (दि. १७) दुपारी तीन वाजता ४ महिन्यांची बालिका धनश्री राजेंद्र नागपुरे हिचे अनोळखी महिलेने घरातून अपहरण केले होते. याबाबत राजेंद्र प्रभाकर नागपुरे (वय ५३) यांनी चाकण पोलिसांत तक्रार दिली होती. धक्कादायक बाब म्हणजे ही व्यक्ती त्या चिमुकलीचे वडील नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.